section and everything up until
* * @package Newsup */?> वाशिम : समाजकार्य महाविद्यालच्या विद्यार्थ्यांचे मार्फत बेटी बचाव-बेटी पढाव जनजागृती शिबीर | Ntv News Marathi

समूदाय संघटन व विकास अंतर्गत उपक्रम


वाशिम:-श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या वतीने बेटी बचाव-बेटी पढाव या शासनाच्या उपक्रमाबाबत शिबीर घेण्यात आले

वाशिम तालुक्यातील सोनखास या ग्रामपंचायतीत दि.१३ ते १७ डिसेंबर दरम्यान याबाबत विविध उपक्रम राबवुन लोकांमध्ये जागृती करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ एकात्मिक महिला व बाल विकास अधिकारी (ग्रामिण) प्रियंका गवळी यांच्या हस्ते करण्यात आला. गवळी यांनी सामाजिक-राजकीय तसेच अन्य क्षेत्रात महिलांच्या योगदानाची माहिती दिली. स्री- पुरुष समानतेचे तत्व व्यवहारात आणल्यास स्रीभ्रुण हत्येला आळा बसेल, मात्र यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी अॅड. राधा नरवलिया, सरपंच देमाजी बांगरे, उपसरपंच डाॅ. श्यामसुंदर गोरे, मुख्याध्यापक जगन्नाथ आरु, शिक्षक बबन काकडे यांनी मार्गदर्शन केले.
एकुण पाच दिवस चाललेल्या या शिबीरात नामवंत महिलांनी भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. अश्विनी इंगळे यांनी “मी सावित्रीबाई फुले बोलतेय” हा एकपात्री प्रयोग सादर केला. अॅड. राधा नरवलिया यांनी गर्भलिंग चाचणी करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगुन मुलींचा जन्मदर वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.यानंतर समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोनखास येथे गृहभेटी देऊन माहिती पत्रकाचे वितरण केले.दि 17 रोजी उमेद अभियानाच्या भाग्यश्री अडगूडवाड यांनी “महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि बचतगटाची चळवळ” याबाबत मार्गदर्शन केले. दि. 18 ला शाळेतील विद्यार्थ्यांनी मुलगी वाचवा-मुलगी शिकवा अशा घोषणा देत संपुर्ण गावातुन फेरी काढत लोकांचे लक्ष वेधले. या रॅलीमध्ये झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ, माता रमाई यांची वेशभूषा करुन विद्यार्थीनींनी सहभाग घेत त्यांचा संदेशही दिला.

श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. आर एस मडावी यांच्या मार्गदर्शनात या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन अॅड. दिपाली सांबर- श्रृंगारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी रंजना बुंदे, शुभम जवंजाळ, अश्विनी तायडे, सचिन आसोले, पुष्पा लवटे, सचिन आसोले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सरपंच देमाजी बांगरे, उप सरपंच डाॅ. शामसुंदर गोरे, मूख्याध्यापक जगन्नाथ आरु, शिक्षक बबन काकडे, अनंता सावजी, सुर्वे, पुण्यवती सरकटे, वैशाली सरकटे, नंदाताई गोरे यांचे सहकार्य लाभले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *